शिवाजी महाराजांचे काल्पनिक चित्र आणि त्याचा चुकीचा इतिहास पसरवणे बंद करा

shivaji  maharaj

सध्या सर्वत्र शिवराज्याभिषेकाचे एक चित्र प्रसिद्धी पावते आहे. मुळात हे चित्र मोठ्या प्रमाणावर छापून मोफत वितरित केले गेल्यामुळे व आमचा इतिहासाचाही फार कमी अभ्यास असल्याने आम्ही ते मोठ्या दिमाखात दिवानखान्यात लावतो!

१) चित्रात शिवरायांच्या मागे उभ्या असलेल्या स्वामिनिष्ठ रामचंद्र पंत अमात्यांना वगळून त्या जागी एक मुघली शिपाई उभा दाखविला आहे
मुळात आपले बंधू व्यंकोजी यांनी सैन्यात तुरुक अर्थात मुस्लिम ठेवले म्हणून त्यांची शिवरायांनी केलेली उघड कानउघाडणी प्रसिद्ध आहे. तसेच मदारी मेहेतर कसे थोतांड आहे हे हि आता इतिहासतज्ञ विशाल खुळे यांनी संशोधनासह सिद्ध केले आहे, त्यांचा प्रबंध दासबोध,भारत येथे वाचनास उपलब्ध आहेच)

२) चित्रात महाराजांसमोर अरब झुकताना दाखविलेले आहेत.मुळात अरबांचा हा वेशच अगदी अलीकडचा आहे.त्या काळात अरबस्तानात निवडुंगही पिकत नसे तिथे कापूस पिकून वस्त्र निर्मिती तर फारच दूरची गोष्ट! म्हणूनच हे यवन इथे आल्यावर सोन्यासह कपडेही लुटत कारण ते खरोखरच वस्त्राना मोताद होते. हे सारे अरबी वैभव गेल्या ८० वर्षातले आहे. तेला चा शोध लागल्यावर असली उंची वस्त्रे निघाली. त्यातही इतका पांढरा शुभ्र सदरा करण्याइतपत ब्लिचिंगचे तंत्रज्ञान त्यांच्या कडे कधीच नव्हते व आजही नाही! तसेच अरब थेट आपल्या इथे आलेले नाहीत, आपल्या भूमीवर आले ते इराण,इराक,मंगोलिया,अफगानातील मुसलमान, त्यामुळे हा सरळ सरळ इतिहासाचा विपर्यासच आहे...!
३) चित्र अत्यंत बेढब असून शिवरायांच्या पायाशेजारील खांब,व त्यावरील कमान पहा. पूर्णपणे विसंगत चित्र आहे व अगदीच नवख्या व स्वस्तात कलेचा बाजार मांडणाऱ्या बाजारबूनग्याने रेखाटलेले हे चित्र वाटते. त्यातील एकही पात्राच्या चेहेऱ्यावर प्रसन्नता,सात्विकता,शिवराय राजा झाल्याचा आंनद जाणवत नाही.
४) चित्रात शिवरायांचा मोठाच जनांनखाना दाखविला आहे,हे अत्यंत अनैतिहासिक आहे.
५) राजाराम केवळ तीन साडे तीन वर्षाचे असताना ते वयाने मोठे दाखवलेले आहेत.
६) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाला चित्रातून हेतुपूर्वक फाटा दिला गेला आहे.
७) चित्रातील सुवासिनी गायब आहेत
८) म्हालाबाहेर इंग्रजी पद्धतीच्या २ वखारी चितारलेल्या आहेत.
९) महाराजांवर छत्र धरण्याचा मान वेल्हा तालुक्यातील खामगाव-छत्र या गावातील मानकर्यांचा असे.तो छत्रधारीही बाजूला उभा केलेला आहे.डोक्यावर छत्र धरलेले नाही. तात्पर्य हे चित्र अत्यंत अनैतिहासिक असून फुकट मिळाले तरी घेऊ नयेच उलट जिथे दिसेल तिथे तिथे त्या माणसांचे प्रबोधन करून ते काढावयास लावून ,मूळ राज्याभिषेकाच चित्रच लावावे...!
शिवाजी महाराजांचे काल्पनिक चित्र आणि त्याचा चुकीचा इतिहास पसरवणे बंद करा शिवाजी महाराजांचे काल्पनिक चित्र आणि त्याचा चुकीचा इतिहास पसरवणे बंद करा Reviewed by Niranjan Yamgar on May 26, 2019 Rating: 5

No comments